| सर्वांकण मूल्यमापन
सर्वांकण मूल्यमापनाचा भार आला
आणि शिक्षक वर्ग बेजार झाला
शिक्षकांचे शिकवणे कमी झाले
निरीक्षण, मूल्यमापन यांच्या नोंदी झाल्या
विद्यार्थी, पालक तणावमुक्त झाले
निरीक्षण, मूल्यमापन यांच्या नोंदी झाल्या
आधीच्या परिक्षा बऱ्या होत्या शिक्षक म्हणू लागले
सर्वांकणाचे तंत्र समजण्यात वर्ष सरू लागले
शिक्षकांना गरज मार्क देण्याची म्हणून
विध्यार्थ्यांच्या समोर हात पसरू लागले
विध्यार्थी मात्र आता आमचे तुम्ही काय बिघडवणार
असे मनात म्हणू लागले
सर्वांकण मूल्यमापनाने विध्यार्थी झाला बेफिकीर
शिक्षक मात्र अडकला मानेवर मुलांचे ओझे लटकवीत
शिक्षित करण्या निघाले आहोत सर्व देस पण
अश्या तंत्राने बदलेल का हो अशिक्षितांची रेष?
- कल्पना परुळेकर |