एम.बी.ए.

ओळख :- 

एम.बी.ए म्हटले की आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभा राहता त्याच्याबद्दल जरा चर्चा ह्या सत्रात करुया. हे गतिमान झालेला विश्व आपल्याला भरमसाथ माहिती आपल्याला क्षणार्धात उपलब्ध करून देइल. सम्बंधित कोर्स त्याची फी त्यासाठी द्याव्या लागणार्या परीक्षा वगैरे माहिती तर उपलब्ध आहेच पण त्याही पलिकडे जाउन ह्या कोर्स बद्दल माहिती करून घेना गरजेचा वाटते. कारण जितकी जास्त माहिती उपलब्ध तितकी जास्त आपली मनस्थिति द्विधा होते, तेव्हा ह्या तांत्रिक बाबिन्ना बगल देऊन जरा व्यापक अर्थाने चर्चा करुया. आजच्या युगात व्यवस्थापन क्षेत्राकडे व्यापक दृष्टीने पाहण्याची वेळ आली आहे. साधारणत: व्यक्तिमत्व विकास आणि द्न्यानात भर पड़ने हच शिक्षणाचा हेतु मानला जातो पण तय विकासाला आणि द्न्यानाला व्यव्सायिकतेची जोड़ जर मिळाली तरच ह्या स्पर्धेच्या युगात टिकाव लागने शक्य आहे. आणि हाच व्यवसायिक दृष्टिकोण देण्याचा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच ह्या कोर्स  ची रचना करण्यात आली आहे. साधारण एक सुशिक्षित माणूस त्यच्या त्याच्या फिएल्ड मध्ये कार्य करत असतो पण जेव्हा तुम्ही आपल्या द्न्यानाला व्यव्सयिकतेची जोड़ देता तेव्हाच तुमच्या कामाला अधिक मूल्य प्राप्त होत. अगदी सुरुवातीला ह्या कोर्स ला भारतात मान्यता मिळाली तेव्हा जागतिकिकरानाचा आणि उदार मत्वदाचा फारसा बोलबाला नव्हता पण जेव्हापासून ह्या दोन गोष्टींना महत्व प्राप्त झाले तेव्हापासून मात्र ह्या कोर्स ची महती पण वाढली आहे. काही  वेळा असा सूर पण ऐकण्यात येतोय की आता ह्या कोर्स ला मागणी नाहीये किंवा हयात कही अर्थ ही नाहीये पण जर आपण ह्या बद्दल जरा खोल अभ्यास केला आणि तपशीलवार माहिती काढली तर अनेक गोष्टिन्वराचा पडदा दूर होतो. आपल्या नियमीत शिक्षण व्यतिरिक्त अनेक गोष्टी ज्या खूप महत्व बालागुण असतात त्यांचा इथे जो अभ्यास होतो तो खूप महत्वाचा आहे. 

रचना :-
ह्या कोर्सची दोन वर्ष अगदी विचारपूर्वक रचण्यात आली आहेत. आणि संपूर्ण कोर्स हा सेमिस्टर पाटर्न वर आधारित आहे. एकून ४ सेमिस्टर द्यावे लागतात. ज्यतिल्पहिली दोन सेमिस्टर ही सर्वांसाठी सारखीच असतात. म्हणजे पाहिले दोन सेमिस्टर जे आहेत त्यात सर्व विद्यार्थ्यांना सारखेच विषय शिकावे लागतात. पाहिले वर्ष हे इकोनोमिक्स, अकाउन्ट्स, बिज़नस ला, इत्यादी महत्वाचे आणि पायाभूत असे विषय सर्वांना शिकवले जातात. दुसरे सेमिस्टर मध्ये मात्र वेगवेगले जे स्पेशालाय्ज़शानाचे विषय आहेत त्यांची ओळख करूँ दिली जाते जेने करून कोनती फिल्ड निवडावी हे तहरवाने सोपे जाते. 
आजच्या घडीला उपलब्ध असणारे असे 5 प्रमुख प्रकारचे स्पेशालायाज़शानाचे प्रकार आहेत.
फायनांस, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, आय टी, प्रोडक्शन, 

पात्रता :-
१. ज्या विद्यार्थ्याने कोणत्याही शाखेची पदवी ज्याचा कालावधि ३ वर्षे आहे, त्यात  किमान ५० % ( काही आरक्षित संवर्गसaठी ही मर्यादा ४५ % इतकी आहे) गुण मिलवुन उत्तीर्ण झाली आहे.
२. जो विद्यार्थी वरील प्रमाने कोणत्याही  शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल म्हणजे तिसर्या वर्षात आणि त्याने सदर कोर्स सही सम्बंधित प्रवेश परीक्षा दिली आहे. उदा. एम बी ए २०१२-१३ ह्या वर्षासाठी जर तुम्हाला प्रवेश हवा असेल आणि तुम्ही पदवीधर नसाल तर किमान तुम्ही ज्या पदवीचे शिक्षण घेत आहात त्याची तिसर्या वर्षाची परीक्षा तुम्ही मार्च/एप्रिल २०१२-१३ मध्ये दिलेली असावी.
३. एम् बी ए ची मान्यताप्राप्त अशी एम् बी ए सी इ टी म्हणजेच कॉमन एंट्रंस टेस्ट उत्तीर्ण होने अआवश्यक. पण काही महाविद्यालायांसठी त्यांची स्वतंत्र अशी परीक्षा असते. 
४. जे विद्यार्थी लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटर व्ह्यु द्यावा लागतो.

विविध शाखा :-
जर पहायला गेल तर आपणास माहिती असणार्या फार कमी शाखा आहेत ह्या कोर्सच्या आणि प्रत्येक कॉलेज मध्ये ज्या फार प्रचलित आहेत अश्याच शिकवल्या जातात. खलील यादी ह्या कोर्स च्या अंतर्गत उपलब्ध असणार्या शाखांची आहे.
१.एम् बी ए फायनांस 
२. एम् बी ए मार्केटिंग
३. एम् बी ए ह्युमन रिसोर्स 
४. एम् बी ए इन्फोर्मशन टेक्नोलॉजी
५. एम् बी ए प्रोडक्शन 
६. एम् बी ए एग्री बिजनेस
७. एम् बी ए एविअशन 
८. एम् बी ए बैंकिंग 
९. एम् बी ए ब्रांड मनेजमेंट 
१०. एम् बी ए बिजनेस एडमिनिस्ट्रेशन
११. एम् बी ए बिजनेस मनेजमेंट
१२. एम् बी ए क्लिनिकल रिसर्च 
१३. एम् बी ए कंस्ट्रक्शन 
१४. एम् बी ए इकोनोमिक्स 
१५. एम् बी ए फैशन डिजायनिंग 
१६. एम् बी ए हेल्थ केअर
१७. एम् बी ए होटल मैनेजमेंट 
१८. एम् बी ए होस्पितालिटी मैनेजमेंट 
१९. एम् बी ए हॉस्पिटल एडमिनिस्ट्रेशन
२०. एम् बी ए इन्फ्रास्त्रक्चर मैनेजमेंट
२१. एम् बी ए इन्शुरन्स एंड रिस्क मैनेजमेंट
२२. एम् बी ए इंतर्नैश्नल बिजनेस
२३.एम् बी ए लॉजिस्टिक मैनेजमेंट
२४. एम् बी ए मीडिया मैनेजमेंट
२५. एम् बी ए ओईल एंड गैस मैनेजमेंट
२६. एम् बी ए ऑपरेशन मैनेजमेंट
२७. एम् बी ए मटेरियल मैनेजमेंट
२८. एम् बी ए पर्सोनल मैनेजमेंट 
२९. एम् बी ए पेट्रोलियम मैनेजमेंट
३०.एम् बी ए फार्मा
३१. एम् बी ए पब्लिक रिलेशन मैनेजमेंट
३२.एम् बी ए रियल इस्टेट मैनेजमेंट
३३. एम् बी ए रुरल मैनेजमेंट
३४. एम् बी ए रिटेल मैनेजमेंट
३५. एम् बी ए सेल्स एंड मार्केटिंगमैनेजमेंट
३६. एम् बी ए सप्प्लाय चेन मैनेजमेंट
३७. एम् बी ए टेलिकॉम मैनेजमेंट
३८. एम् बी ए टूरिज़म मैनेजमेंट 

इतक्या विस्तृत क्षेत्रात आपल्याला शिक्षण घेता येइल. सम्बंधित क्षेत्रातील नैपुण्य मिलवुन आपल्याला करिअर घडवता येइल. पण ह्यातील सगलेच कोर्सेस सगालिकदेच उपलब्ध असतील असा नहीं तरीही हे कोर्सेस भारतात मात्र उपलब्ध आहेत आपली आवड आपल कल तपासून योग्य तो निर्णय आपल्या उप्लाब्धातेनुसार आपणच घ्यावा.

नचिकेत राजेंद्र देशपांडे

काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर