आपण आणि इंटरनेट

तुमचा ई-मेल आहे का? असे विचारल्यास "नाही" असे उत्तर आता क्वचितच ऐकायला मिळते. इथे आत्ता प्रत्येकाचा ई-मेला आयडी आहे. अंडरस्कोर अथवा वाढदिवस वर्ष वापरुन का होईना प्रत्येकाने आपला ई-मेल बनविला आहे. मग त्याचा वापर किती होतो हा विषय नाही कारण मोबाईल सेल फोने प्रमाणेच आपला स्वतःचा ई-मेल असणे आता आवश्यक झाले आहे. कारण ई-मेल नसणे म्हणजे काही त्या व्यक्तीचे शिक्षणच झाले नसून तो अगदीच अशिक्षित असल्याप्रमाणे पाहिले जाते आणि तूझा ई-मेल आयडी नाही? असा प्रश्न म्हणजे तू कुठल्या जगात राहतोस असे विचारल्या प्रमाणे वाटतो. म्हणून प्रत्येकाने कुणाच्याना कुणाच्या मदतीने आपला ई-मेल बनविलेला असतो.

ई-मेल सोबत आता 'फेसबूक', 'ऑर्कुट' चा देखिल वापर वाढलेला आहे. २-३ वर्षापूर्वी आपल्या रोजच्या कामामध्ये आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींना विसरुन गेलेली तरुण वयातील मुले-मुली आता इंटरनेटवर फेसबूक, ऑर्कुट माध्यमातून सर्व शाळा-कॉलेजमधिल मित्रमैत्रिणींसोबत आपल्या बालपणी हरविलेल्या सवंगड्यांना शोधताना आढळतात. फेसबूक, ऑर्कुट वर आपल्या मित्रमैत्रिणींचे मित्र देखिल पाहता येत असल्याने जून्या आठवणींना उजाळा देत नवनविन मित्रमैत्रिणींशी ओळखी वाढविण्याचे प्रमाण देखिल वाढले आहे.

फेसबूक, ऑर्कुट वर काही बंधन नाही आपण कुणालाही आपल्याशी मैत्री करण्यासाठी निमंत्रण देऊ शकत असला तरी आपली मैत्री स्विकारायची की नाही हे सर्वस्वी तीच व्यक्ती ठरविते जीला आपण मैत्रीचे निमंत्रण पाठविले आहे. मग या वेबसाइटवर ऑनलाईन गेम्स खेळणे, स्कॅप (संदेश) पाठविणे, शुभेच्छा देणे, आपले फोटो शेअर करणे, इ.. सर्व गोष्टी शक्य असल्याने फेसबूक, ऑर्कुटवर एकदा अडल्यास लगेच सुटका होत नाही. सोबत यावर आपल्या मित्रमैत्रिणींच्या यादीतील कुणी त्याचवेळेस ऑलनाईन असल्यास आपण त्याबरोबर थेट चॅट करु शकतो. त्यामूळे 'चॅटींग' हा गेल्या दशकातील इंटरनेटच्या विश्वातील शब्द आता वेगळा न राहता फेसबूक, ऑर्कुटवर इतर बर्‍याच गोष्टींमध्ये समाविष्ट झाला आहे.

'ट्विटर' या अजून एका वेबसाइटची प्रसिद्धी हळूहळू इंटरनेटवर वाढताना दिसून येत आहे. आपल्याला हव्या त्या विषयावर हवे ते बोलण्याची संधी इथे उपलब्ध आहे. थोडक्यात का होईना आपण या वेबसाईटवर आपल्या खात्यामध्ये आपल्याला हवे ते लिहू शकता. फक्त मर्यादा आहे ती १४० शब्दांची. १४० शब्दांमध्ये आपण बोला अशी सक्ती इथे असली तरी १४० शब्द असे एकावेळेस असे कितीही वेळा आपण लिहू शकता. ट्विटरचा जास्त उपयोग तरुण वर्गामध्ये नसून प्रसिद्ध व्यक्ती या ट्विटरच्या वेबसाइटचा वापर करताना दिसून येतात. हवे ते बोलून प्रसिद्धीमध्ये राहण्याच्या त्यांच्यासाठी हा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्यातर बरेच सिनेकलाकार सुद्धा ट्विटरद्वारे स्वतःचे इतरांबद्दल मत मांडतात. ट्विटरवर असलेल्या फॉलोवर्सद्वारे आपण बोलले किती जण ऐकतात हे कळते तर सिनेकलाकारांसाठी त्यांचे जेवढे फॉलोवर्स जास्त तितके त्यांचे फॅन जास्त असे बोलले जाते.

फेसबूक, ऑर्कुट टाईमपास करण्यासाठी तर ट्विटर आपले मत मांडण्यासाठी बनविलेल्या वेबसाइट आहेत. 
'ब्लॉग' हा इंटरनेटवरील अजून एक आपल्याला हवे ते इतरांना सांगण्यासाठी बनलेला अजून एक प्रकार. ब्लॉग हा ब्लॉगर या वेबसाइटवर बनविता येतो. ब्लॉग हा थोडक्यात नोंदवही प्रमाणे काम करतो. आपण आपल्याला हवे ते आणि हवे तितके लिहू शकता. ट्विटरप्रमाणे इथे लिहिण्यासाठी मर्यादा नाही. आपण आपल्या ब्लॉगवर कविता, गोष्टी, बातम्या, कथा, विनोद, स्वतःबद्दलची माहिती, चित्र, विडिओ इ.. आपण आपल्याला हवे ते आपण आपल्या ब्लॉगवर प्रसिद्ध करु शकता. आपण आपल्या ब्लॉगवर टाकलेले सर्व साहित्य ब्लॉगवर एखाद्या वेबसाइटप्रमाणे सर्वांसाठी दिसू लागते. ब्लॉगमध्ये त्याचे डिझाईन म्हणजेच - टेम्प्लेट - बदलण्याची देखिल सोय असते. ज्याद्वारे आपण काही मिनिटांमध्येच ब्लॉगचा चेहरामोहरा बदलू शकता. ब्लॉगचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ब्लॉगर ही गुगलची सेवा असल्याने असल्याने आपण त्यावर गुगलच्या मोफत जाहिराती वापरुन पैसे देखिल कमवू शकतो. गुगलच्या - ऍडसेंस - या सेवेद्वारे आपण गुगलच्या जाहिराती आपल्या ब्लॉगवर टाकू शकतो.

इंटरनेटवरील या निरनिराळ्या सेवांप्रमाणे अजून एक मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत असलेली सेवा म्हणजे मोफत एस.एम.एस. पाठविण्याची सेवा. गेल्या दोन वर्षभरापूर्वी एस.एम.एस. कोट्यावधी रुपये कमविणार्‍या मोबाईल कंपन्यांना या इंटरनेटवरील मोफत एस.एम.एस. पाठविण्याच्या सेवेमूळे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकासान होवू लागले आहे. मोफत एस.एम.एस. पाठविण्याची सेवा देणार्‍या वेबसाइटमध्ये 'वेटूएस.एम.एस.' (www.way2sms.com)  ही वेबसाइट चांगलीच प्रसिद्ध आहे. या वेबसाइटवरुन आपण देशामध्ये कोणत्याही नेटवर्कच्या मोबाईलवर मोफत एस.एम.एस. पाठवू शकता. या वेबसाइटवरुन पाठविलेल्या प्रत्येक  एस.एम.एस. च्या शेवटी त्यांची छोटीशी जाहिरात असते. शेवटी काहीही असले तरी शेवटी फुकट ते पौष्टीक. काहीच पैसे लागत नसल्याने दररोज लाखों लोक या व अशा मोफत  एस.एम.एस. देणार्‍या वेबसाइटचा वापर करत असतात.

या अशा बर्‍याच मोफत गोष्टी गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेटवर उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यांचा वापर देखिल वाढत आहे. त्याचसोबत दररोज हजारो नवनविन वेबसाइट (संकेतस्थळे) निर्माण होत आहेत. यामध्ये मराठी वेबसाइट देखिल मागे नाहीत गेल्या वर्षभरामध्ये अनेक मराठी वेबसाइट निर्माण झाल्या आहेत. ब्लॉगने इंटरनेटवर आपली माहिती ठेवण्यासाठी सर्वसामान्यांना चांगलाच मार्ग उपलब्ध करुन दिला असला तरी प्रत्यक्ष स्वतःची वेबसाइट बनविणे हे अजूनही अनेकांन कठीण वाटते. पण काही मोफत वेबसाइटने आता तो मार्ग देखिल सर्वसामान्यांसाठी मोकळा करुन दिला आहे. या वेबसाइटवर आपण अगदी सहजपणे आपली साधी नाही तर अद्ययावत अशी वेबसाइट अगदी काही वेळामध्ये बनवू शकता. सर्व काम ऑनलाईन करुन आपण आपली वेबसाइट बनवू शकता यासाठी www.multiply.comआणि www.wix.com  या दोन वेबसाइट आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत. या वेबसाइटवर आपण ऑनलाईन वेबसाइट बनवू शकता. महत्वाचे म्हणजे या वेबसाइटवर आपली वेबसाइट बनविल्या नंतर आपण हवे तेव्हा लगेच आपल्या वेबसाइटचे डिझाईन बदलू शकतो. तसेच चित्रे आणि विडिओ अशा अनेक गोष्टी इथे वापरता येतात.

इंटरनेटचा वाढता वापर हाच इंटरनेटवर विविध सेवा सुरु करण्यासाठी मदत करीत आहे. त्यामूळे भविष्यामध्ये इंटरनेट हा कोणतेही काम करण्यासाठी आणि सर्वांशी संवाद साधण्याचा एकमेव मार्ग असेल. अशा स्थितीमध्ये आपल्याला देखिल चालू आणि जून्या गोष्टी न वापरता नविन उपलब्ध होणार्‍या गोष्टी शिकून त्यांचा वापर करायला हवे. यासाठी इंटरनेटचा वापर फक्त करमणूकीसाठी न करीता आपल्या दररोजच्या आयुष्यात आणि कामासाठी कसा करता येईल हे पाहिले पाहिजे.

- सचिन पिळणकर - मो. ९८९२२ ४१४३३

काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर