आयटीआय हा करिअरचा उत्तम पर्याय 

एम. बी. भुतांगे (संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय) 
दहावीनंतर विद्याथीर् पालक पहिल्यांदा सायन्ससाठी प्रयत्न करतात. तेथे प्रवेश शक्य नसेल तर मग कॉमर्स, आर्ट्स शाखेचा विचार केला जातो. त्यानंतर पसंती दिली जाते ती डिप्लोमा कोसेर्सना. आणि अगदीच कुठे प्रवेश मिळाला नाही तर मर्ग अगदी नाईलाजाने आयटीआय चा विचार केला जात होता. पण इतर कोणत्याही शाखेइतक्याच किंबहुना त्यापेक्षा अधिक संधी आयटीआयद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. इंडस्ट्रीला प्रशिक्षित कारागिरांची मोठी गरज भासतेय. मागणी वाढत असली तर त्याप्रमाणात कुशल कामगार मिळणे अवघड जात आहेत. त्यामुळे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या उत्तम संधी चालून आल्या आहेत. शिवाय आयटीआय झाल्यानंतरही इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षणाचा पर्यायही विद्यार्थ्यांसमोर खुला आहेच. आयटीआय केल्यानंतर नोकरीसोबतच स्वयंरोजगार करण्याचाही विचार विद्याथीर् करु शकतात. इंडस्ट्रीच्या गरजा लक्षात घेऊन राज्य सरकारनेही आयटीआयमधील अभ्यासक्रमांमध्ये बदल केले आहे. इंडस्ट्रीसोबत टाय-अप करुन नव्या नव्या योजना हाती घेण्यात येत आहेत. यंदा आयटीआय कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे शंभर टक्के प्लेसमेण्ट झाल्या आहेत हे आम्ही अभिमानाने सांगू इच्छीतो. 

सर्वच पालकांना आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर व्हावे असे वाटते. अनेकदा मुलगा हुशार असतो पण आथिर्कदृष्ट्या परवडणारे असते तर कधी आथिर्क स्थिती चांगली असते पण मुलाची आवड ध्यानात घेतली जात नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलासाठी करिअर निवड करताना या गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात. तसेच आयटीआयकडे बघण्याचा दृष्टीकोनही सर्वांनी बदलायला हवा.
आयटीआयच्या काही कोसेर्बद्दलची माहिती घेतल्यानंतर आता तिथे प्रवेश कसा घेता येईल ते पाहू. प्रत्येक संस्थेतून सर्वच कोसेर्स शिकवले जात नाहीत. त्या

संस्थेस उमेदवारांना प्रवेश घ्यायचा असेल त्या संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या कोसेर्सची माहिती घेऊन त्यानुसार प्रवेश घ्यावा. 

प्रवेशासाठी अर्ज करण्याची पद्धत 

मागासवगीर्य उमेदवारांसाठी लाल रंगाचा (२० रुपये)व अन्य उमेदवारांसाठी काळ्या रंगाचा (३० रुपये)असे वेगवेगळे अर्ज मिळतात. 
उमेदवाराने त्या नमुन्यात आणि स्वहस्ताक्षरात अर्ज करणे आवश्यक आहे. 
प्रवेशासाठी घोषित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण भरलेला व सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या प्रती जोडलेला अर्ज सादर करावा. सर्व झेरॉक्स प्रती साक्षांकित असाव्यात. 
आठवी, दहावी आणि बारावी उत्तीर्ण यापैकी जसे प्रवेश उपलब्ध असतील त्यानुसार उमेदवारास प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र अर्ज सादर करावा लागतो. 

प्रवेशाच्या अटी 

आठवी, दहावी आणि बारावी या किमान अर्हतेच्या अटीपेक्षा अधिक अर्हता असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतात. 
उमेदवार ज्या तालुका क्षेत्रातील मान्यताप्राप्त शाळेतून उत्तीर्ण झाला असेल त्या तालुका क्षेत्रातच प्रवेश पात्र ठरेल. एखाद्या उमेदवारास एका विशिष्ट अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल आणि तो त्याच्या औद्योगिक संस्थेत नसेल तर अशा बाबतीत अन्य तालुक्यात अर्ज करता येतो. 
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील सर्व व्यवसायातून महिलांसाठी २५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. अपंग उमेदवारांसाठीही ३ टक्के जागा राखीव असतात. 
प्रवेशासाठी उमेदवाराचे वय १४ ते ४० वर्षांदरम्यान असावे लागते. 
प्रवेश पात्र उमेदवारांची वैद्यकीय अधिकाऱ्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात येते. प्रशिक्षणासाठी शारीरिकदृष्ट्या पात्र असलेल्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जातो. 
प्रवेशपात्र परीक्षेमध्ये उमेदवारांनी मिळवलेले गुण व विशेष अर्हता, खेळातील प्रावीण्य, आरक्षण यांना अनुसरुन उमेदवारांची निवड केली जाते.
प्रवेश घेताना सर्व उमेदवारांना ५० रुपये डिपॉझिट भरावे लागते. वसतिगृहाची सुविधा हवी असल्यास त्यासाठी आणखी २५ रुपये भरायचे असतात. 
प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याकडून दरमहा १५ रुपये या प्रमाणे प्रशिक्षण शुल्क आकारले जाते. (मागासवगीर्य व उच्च उत्पन्न गटात नसणारे उमेदवार वगळून) वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दरमहा २० रुपये वसतिगृह शुल्क आकारले जाते. 
सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत ब्रॉड बेस ट्रेनिंगकरीता प्रत्येक उमेदवाराकडून २७८० रुपये शुल्क आकारणी करण्यात येते. 
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही काही कोसेर्स राबविण्यात येतात. 

६ महिन्यांचे बिगरअभियांत्रिकी अभ्यासक्रम 

टूरिस्ट गाईड 

नेटवर्क टेकिन्शियन 

मेडिकल ट्रान्सस्क्रिप्शन 

लायब्ररी इन्फमेर्शन सायन्स 

हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट 

१ वर्ष कालवधीचे 

बिगरअभियांत्रिकी अभ्यासक्रम 

इंग्रजी लघुलेखन 

सेक्रटरिअल प्रॅक्टिस 

फॅशन टेकनॅलॉजी 

डेस्क टॉप पब्लिशिंग 

डिजीटल फोटोग्राफर 

मराठी लघुलेखन 

हॉटिर्कल्चर 

हॉस्पिटल हाऊस किपिंग 

अशाही योजना 

याशिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये लोकसेवा केंद, मागेल त्याला व्यवसाय प्रशिक्षण, एप्लॉयबल मॉड्युलर स्किल, आटिर्झन टू टेकनेक्रॅट, शिकाऊ उमेदवारी योजना, एव्हिेशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट विविध योजना राबविण्यात येतात. 

प्रशिक्षणादरम्यान मिळणाऱ्या सुविधा 

५० टक्के प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्येकी दरमहा ४० रुपयेप्रमाणे विद्यावेतन 
एसटी, रेल्वे प्रवास सवलत 
खेळ, करमणूक व वैद्यकीय मदत यांची विनामूल्य सोय 
आदिवासी प्रशिक्षणार्थ्यांना मिळणाऱ्या विशेष सुविधा 
अनुसूचित जातीच्या दहावी पास प्रशिक्षणार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती 

अधिक माहितीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, ३, महापालिका मार्ग, मुंबई-१ या पत्त्यावर संपर्क साधावा.


काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर