कॉम्प्युटर इंजिनिअरींग

कॉम्प्युटर इंजिनिअरींग कोर्स आपल्याला सतत आय.टी. क्षेत्रातली माहिती अपडेट ठेवण्याची संधी उपलब्ध करून देते. जसा जसा हार्डवेअर, नवीन नवीन कम्युनिकेशन सिस्टिमस् आणि सॉफ्टवेअर यात विकास होत आहे, तसच कॉम्प्युटर अभियंत्यांची गरज जास्तीत जास्त लागणार आहे.
कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे विध्यार्थी डिजीटल हार्डवेअरच्या डिझाईनचा व सोफ्टवेर सिस्टिम चा अभ्यास करतात. ह्या कोर्स माधे ऑपरेटिंग सिस्टिम, कॉम्प्युटर आर्किटेक्चर, कॉम्प्युटर नेटवर्कस, रोबोटिकस, अर्टीफिसिअल इंटेलिजन्स आणि कॉम्प्युटर एडेड डिझाईन ह्या विषयांचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर असतो.
पात्रता:
डिप्लोमा साठी : १० वी पास
डिग्री साठी: १२ वी पास (सायन्स शाखेतून)
रोजगार संधी:
कॉम्प्युटर अभियंतांना हार्डवेअर आणि कॉम्प्युटर सिस्टिम डिझाईन, कॉम्प्युटर नेटवर्कस, सोफ्टवेअर इंजिनिअरींग, डेटा कम्युनिकेशन्स, मल्टिमीडिया प्रोसेसिंग, इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात रोजगाराला मोठ्या प्रमाणावर संधी असते. जेव्हा आपण कोर्स करण्याचा विचार करतो तेव्हा एका मोठ्या कंपनी मध्ये नोकरी करणाऱ्यांना बघून प्रेरित होतो. आजची परिस्थिती अशी आहे कि तंत्रज्ञान क्षेत्रातच नाही तर इकोनोमी सेक्टर, सरकारी ओफिचे काम या सगळ्यात कॉम्प्युटर अभियान्तांची गरज आहे.
पदवीधरांना सरकारी विभागात, बँक, एयरलाइन्स, खासगी कंपन्या आणि उत्पादन विभाग यात रोजगाराची उत्तम संधी मिळते. रोज नाव नवीन छोट्या मोठ्या कंपन्यांची स्थापना होते, त्यांना सुद्धा कॉम्प्युटर क्षेत्रात काम करणाऱ्या अभियान्तांची गरज लागते.

आवशक गुण: 
तुम्ही कल्पकतेने विचार केला पाहिजे
रिडल्स,पझल्स आणि कोडी सोडवणे
कॉम्प्युटर सेवी असला पाहिजे
प्रोग्रामिंगची ओळख असली पाहिजे
गणित आणि विज्ञान या विषयाची आवड

काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर