सिविल इंजिनिअरींग

सिविल इंजिनीयरींग मध्ये रस्त्याची डिझाईन आणि बांधणी, पूल, रेल्वे त्याचबरोबर मोठ्या मोठ्या बिल्डिंगची आखणी अशी कामे येतात. एखादा प्रकल्प डिझाईन आणि प्लान करण्यासाठी आणि त्याची आवश्यक पातळीवर बांधणी करण्यासाठी सिविल अभियंते जबाबदार असतात. फियनाईट एलिमेंट अनेलीसीस, आर्तीफिसीअल इंटेलिजन्स आणि न्यूरल नेटवर्क्स हे ह्या कोर्स मधले नवीन विषय आहेत.

अभ्यासक्रम:

बेसिक इंजिनिअरींग सायन्स
स्ट्रकचर
फाउंडेशन
कन्स्ट्रक्शन
हायड्रायुलीक्स आणि एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरींग
वर्क्स मेनेजमेंट आणि कॉस्ट
ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरींग
इरिगेशन इंजिनिअरींग
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर बी.ई/बी.टेक्., एम.ई/एम.टेक्. आणि सिविल इंजिनिअरींग पी.एच.डी डिग्री, डॉक्टरल आणि पोस्ट डॉक्टरल रिसर्च पदवी प्राप्त करता येते. एखादा विद्यार्थी पोलीटेक्निक किवा AMIE द्वारे डिप्लोमा कोर्स सुद्धा करू शकतो.

रोजगाराची संधी:

बिल्डर क्षेत्रत
सिटी प्लानर
आर्किटेक्ट
सिविल इंजिनिअर
इरीगेशन इंजिनिअर आणि प्लानर
सिविल इंजिनिअर हे पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरच्या डिझाईन, मेंटेनन्स आणि रस्ते बांधणी, हायवे, ब्रिजेश, एयरपोर्ट, हौसिंग कॉम्प्लेक्स, मार्केटप्लेस आदि. सगळ्या शाखांमध्ये रोजगार मिळवू शकतात.

काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर