सिविल सर्विस परिक्षा

ओळख:
सिविल सर्विस हे एक आव्हानात्मक व स्पर्धात्मक क्षेत्र आहे आणि यात भरपूर संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात नोकरी ला सुरक्षितता असते (जॉब सेक्यूरिटी) व हा एक प्रठीष्टीत जॉब आहे. उत्तम पगार सोबत बाकीचे खर्च जसे कि वाहतूक, हौसिंग, मेडीकल केअर व आदि. पण मिळतात.

सिविल सर्विसच्या पदांची यादी:
खालील पदांसाठी परीक्षेद्वारे भारती केली जाते:

इंडिअन एडमीनइसट्रेटीव्ह सर्विस (I.A.S.)
इंडिअन फॉरेन सर्विस (I.F.S.)
इंडिअन पोलिस सर्विस (I.P.S.)
इंडिअन P आणि T अकाउंटस आणि फायनान्स  सर्विस (Group A)
इंडिअन ऑडीट आणि अकाउंटस सर्विस (Group A)
इंडिअन रेवेन्यू सर्विस (कस्टम आणि एक्साईज) Group A
इंडिअन अकाउंटस सर्विस (Group A)
इंडिअन रेवेन्यू सर्विस (Group A)
इंडिअन ऑरडनन्स फाक्टरीस सर्विस (Group A)
इंडिअन सिविल अकाउंटस सर्विस (Group A)
इंडिअन रेल्वे ट्राफिक सर्विस (Group A)
इंडिअन रेल्वे अकाउंटस सर्विस (Group A)
इंडिअन पेर्सोन्नेल सर्विस (Group A)
रेल्वे प्रोटेकशन फोर्स मध्ये असिस्टंट सेक्युरिटी ऑफिसर (Group A)
इंडिअन डिफेन्स इस्टेट सर्विस (Group A)
इंडिअन इन्फोर्मेशन सर्विस – जुनीअर ग्रेड (Group A)
इंडिअन ट्रेड सर्विस (Group A)
आर्म्ड फोर्सेस हेंडक्वार्टर्स सिविल सर्विस – सेक्शन ऑफिसर्स ग्रेड (Group B)
दिल्ही, अंदमान आणि निकोबार बंदर, लक्षदीप, दमन आणि दिऊ आणि दादरा आणि नगर हवेली सिविल सर्विस (Group B)
दिल्ही, अंदमान आणि निकोबार बंदर, लक्षदीप, दमन आणि दिऊ आणि दादरा आणि नगर हवेली पोलिस सर्विस (Group B)
पोन्डिचेरी सिविल सर्विस (Group B)
पोन्डिचेरी पोलिस सर्विस (Group B)
अपंग, एस.सी., एस.टी. आणि ओ.बी.सी. या जातींसाठी जागा नियमाप्रमाणे रक्खीव ठेवल्या जातील.

पात्रता:
कुठलाही पदवीधारक जो सरकारमान्य विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेला असेल किवा समांतर, तो या परीक्षेस पत्र आहे.

राष्ट्रीयता:
I.A.S., I.P.S. साठी अर्ज करण्यासाठी उमेदवार भारतीय नागरिक असला पाहिजे.

बाकीच्या परीक्षांसाठी:

भारतीय नागरिक किवा नेपाळ, भूतान चा विषय असला पाहिजे.

टीबेटन रेफ्युजी जो भारतात कायमचा स्थायीक होण्यासाठी आला असेल तो पण ह्या परीक्षेस पात्र आहे.
जो व्यक्ती पाकिस्तान, बर्मा, श्रीलंका, ईस्ट आफ्रिकेतले देश केनिया, युगंगा, तांझानिया, झांबिया, मालावी, झाईरे, एथोपिया, आणि विटनेम या देशांतून भारतात कायमचा स्थायीक होण्यासाठी आला असेल तो पण पात्र आहे.

वय:
उमेदवार २१ वर्ष ते ३० वर्षाच्या आत असला पाहिजे त्या वर्षाच्या ऑगस्ट पर्यंत.
उमेदवार जर (S.C., S.T.) जातीचा असेल तर तो ३५ वर्षापर्यंत असला तरी चालेल.
उमेदवार जर (O.B.C.) जातीचा असेल तर तो ३३ वर्षाचा असेल तरी चालेल.

शारीरिक पातळी:
सिविल सेर्विस परीक्षेच्या फिसिकल स्टेन्डआर्ड प्रमाणे उमेदवार शारीरिक दृष्ट्या स्वस्थ असला पाहिजे.
S.C., S.T., O.B.C. व अपंग उमेदवारांनाकरता नियम प्रमाणे जागा राखीव ठेवण्यात येतील.

पर्याय:

इंडिअन एडमिनीसट्रेटीव सर्विस (I.A.S.)
I.A.S. अधिकारी केंद्रीय स्थरावर सरकारच्या घडामोडी हाताळतात व त्याची आखणी व अंमलबजावणी करतात. ते दुसऱ्या देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना जिल्हा पातळीवर एखादा करार सरकारच्या प्रतिनिधी म्हणून पास करून घेण्याची मुभा असते, जे जिल्ह्याच्या विकासाच्या घडामोडींशी निगडीत असेल त्याबद्दल. डीविशनल पातळीवर I.A.S. अधिकारी हे कायदा व व्यवस्था आणि विकासाचे काम पाहतात. I.A.S. क्रेड मध्ये तुम्ही सब-मेजीस्ट्रेट, डीस्त्रीक मेजीस्ट्रेट, जो जॉईन्ट डेप्युटी सेक्रेटरी आदि. नेमला जाऊ शकतो.

इंडिअन पोलिस सर्विस (I.P.S.)
I.P.S. हे लोकांच्या सुरक्षिततेसाठी जवाबदार असतात. ते कायदा व व्यवस्थेची I.A.S. अधिकाऱ्यांच्या साह्याने जिल्हा पातळीवर घेतात त्याच बरोबर, क्राईम, तपासणी, वाहतूक नियंत्रण व अपघात विभाग व्यवस्थापन याचीही जवाबदारी घेतात. प्रोबेशन पूर्ण केल्यानंतर I.P.S. अधिकारी त्याच्या करीयरची सुरवात पोलिस सब-डीविजन असिसतंट सुप्रीटेडेंट म्हणून करतो. पोलिस सेवा वेगवेगळ्या खात्यांमध्ये विभागली गेली आहे. जसे कि क्राईम ब्रांच, सी.आय.डी (C.I.D), होम गार्डस, ट्राफिक बियुरो. I.P.S. अधिकारी केंद्रीय पोलिस एजन्सीज जसे इंटेलीजेंस बियुरो (I.B.), CBI, BSF, CRPF यांना सुद्धा सेवा देतात.

इंडिअन फॉरेन सेर्विस (I.F.S.)
बाह्या घडामोडींशी निगडीत असतात जसे, डिप्लोमसी. I.F.S. ही सेवा देशाचा व्यापार व सांकृतिक संबंधात सुद्धा लक्ष देते. एडमिनिस्ट्रेशन व बाहेरच्या देशात भारतीय मिशन हाताळण्यासाठी सरकारच्या फॉरेन पोलीसिंची अंमलबजावणी करण्यासाठी ते जबाबदार असतात. प्रोबेशनर्सना पहिले मिनिस्ट्री अफैर्स व त्यानंतर त्यांना एखाद्या बाहेरील देशात भारतीय एक्स्टर्नल मिशनसाठी थर्ड सेक्रेटरीज म्हणून पोस्टिंग दिली जाते.

इंडिअन रेल्वे सर्विस (I.R.S.)
भारतीय रेल्वे नेटवर्क चालवण्यासाठी ही एक आवश्यक जबाबदारी आहे. रेल्वे मध्ये ४ प्रकारचे तांत्रिक व अ-तांत्रिक किवा इंजीनेअरिंग केडर्स आहेत. अतांत्रिक प्रवेशासाठी I.R.T.S. ही सेवा असते. प्रवाशांच्या व ट्रेनच्या हालचालीकरता I.R.P.S. जबाबदार असते. I.R.A.S. स्टाफचे एडमिनीस्ट्रेशन भरतीसाठी जबाबदार असते. R.P.S. ही अकाउंटस् आणि रेल्वे पोलिस सेवा यासाठी जबाबदार असते. रेल्वेची मालमत्ता जसे कि ट्रेक्स, ईतर साहित्याची जबाबदारी I.R.S.E. कडे असते.

इंडिअन पोस्टल सर्विस
पोस्टल व टेलेग्राफ सेवेसाठी जबाबदार असतात. अधिकारी, फिल्ड ऑफिसर बरोबर प्रशिक्षणा नंतर पोस्ट ऑफिस सेनिअर सुप्रिटेन्दंट म्हणून अपोईंट केले जातात. असिसतंट पोस्ट मास्तर जनरल व केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा देशभरात नेमले जातात.

इंडिअन कस्टम आणि एक्साईझ
मुळत: हे २ भागात संभंदले जातात, कस्टम आणि एक्सिईज. ज्यात कस्टम हे तपासणी व देशात येणार्या ज्या मालावर कर लागू पडतो त्याची लेवी ड्युटी याच्याशी संबंधित. एक्साईज विभाग देशातील करलागू पडणाऱ्या मालाशी साम्भांडीत असतो.

ऑडीट आणि अकाऊंटस सर्विस:
इंडिअन ऑडीट आणि अकाऊंटस सर्विस:
ही कान्त्रोल्लेर आणि ऑडीटर जनरल(CAG) याच्या याली येते जी मेंटेनन्स व अकाऊंटसचे ऑडिट करण्यासाठी जबाबदार असते. हे अधिकारी CAG  व केंद्रीय मंत्री मंडळ व राज्य सरकारच्या खालील ऑफिस माडे ऑडीट करतात. हे डिफेन्स सर्विसचे अकाऊंट मेंटेन व ऑडिट करण्यासाठी जबाबदार असतात.

इंडिअन डिफेन्स अकाऊंटस सर्विस (IDAS)
ही डिफेन्स सर्विसचे अकाऊंटस मेंटेन व ऑडीट करण्यासाठी जबाबदार असतात.

इंडिअन सिविल अकाऊंटस सर्विस (ICAS)
हे सेक्रेटरी (Expenditure) मिनिस्ट्री ऑफ फिनान्स खाली नियंत्रित केले जाते.व राज्य आणि केंद्र सरकार आणि त्याच बरोबर पब्लिक सेक्टरचे खाते मेंटेन करते.

इंडिअन इन्फोर्मेशन सर्विस (IIS)
मिनिस्ट्री ऑफ इन्फोर्मेशन आणि ब्रोडकास्टिंगच्या खाली सरकारी मालकीच्या जाहिरात एजन्सीज जसे कि ऑल इंडिया रेदिओ, दूरदर्शन आणि DAVP चालवण्यासाठी जबाबदार ठरवले जातात. हे प्रेस व वेगवेगळ्या सेंट्रल मिनिस्ट्रीस, पब्लिक सेक्टर इंटरप्रियेझेस आणि डिफेन्स दलाचे पब्लिक रिलेशन्स हाताळण्यासाठी भारतात व बाहेरील देशात जबाबदार असतात.

इंडिअन रेवेन्यू सर्विस (IRS)
हे कराची मांडवळी (tax fixing), एसेस्मेंट व वसुली साठी जबाबदार असतात. ह्यात कारच्या चोकशी (inquuiry), पडताळणी व आदि. साठी विशेष शाखा असतात.

परिक्षा:
परिक्षा दोन पातळींवर असते.
प्रिलिमनरी परिक्षा (Prelimnary exam) [पर्यायी प्रश्न असतात – २०० मार्क]
मुल परिक्षा वेगवेगळ्या पदांसाठी [लेखी व मुलखाती वर निवड] (मुलाखात-३०० मार्क)

अर्ज कसा कराल:
वर्तमान पत्र, रोजगार समाचार, बातम्या यांच्या द्वारे डिसेंबरच्या अखेर पर्यंत अप्प्ल्याला मिहिती मिळते. उमेदवारांनी ओरीजनल अर्ज भरावा, फोटो कॉपी किवा रीडशन केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेदवारांनी परीक्षेचे नाव, परीक्षेचे वर्ष (उदा.‘सिविल सर्विस (Preliminary) परिक्षा, २०००’) लिफाफ्यावर लिहून, दिलेल्या सूचना पळून, पूर्ण भरलेला अर्ज सेक्रेटरी, UPSC hyaह्या नावाने धोलपुर हाऊस, शहाजन रोड, नवी दिल्ही – ११० ०६९ ह्या पत्यावर पाठवावा.

सुचने चे दिनांक: १९ फेब्रुवारी २०११
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारिक: २१ मार्च २०११
परीक्षेची तारीख: २९ ऑक्टोबर २०११
परिक्षाचे कालांतर: २१ दिवस

काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर