एरोनॉटीकल इंजिनीअरींग

ह्या कोर्स मध्ये एका अभियंताला कमर्शिअल आणि मिलिट्री एयरक्राफ्ट्स, मिसाईल्स आणि स्पेसक्राफ्ट्स च्या डिझाईनिंग, बांधणी, पडताळणी, चाचणी, मेनुफेक्चरींग आणि विकास या सगळ्याचे प्रशिक्षण दिले जाते. एरोनॉटिक्स पृथ्वीच्या एटमोस्फियर नियंत्रण करणाऱ्या यांत्रांकडे फोकस करतात आणि एस्ट्रोनॉटीक्स स्पेसच्या. कमर्शिअल आणि मिलिट्री एयरक्राफ्ट्स, मिसाईल्स आणि स्पेसक्राफ्ट्स च्या डिझाईनिंग, बांधणी, पडताळणी, चाचणी, मेनुफेक्चरींग आणि विकास या सगळ्याचे प्रशिक्षण एरोस्पेस अभियांतांना सुद्धा दिले जाते. हे अभियंते कमर्शिअल एविएशन डिफेन्स सिस्टीमस आणि स्पेस एक्स्प्लोरेशन मध्ये नवीन नवीन तंत्रद्न्यान आणि विकास करत असतात.

पात्रता:
डिप्लोमासाठी: १० वी पास (कमीतकमी ५०%)
डिग्रीसाठी: १२ सायन्स वी पास (फिसिक्स, केमिस्ट्री, मेथेमेथीक्स आणि बायोलॉजी)

कोर्स:
एरोनॉटीकल इंजिनीअरींग मध्ये बी.ई. किवा बी.टेक किवा पदवीत्तर कोर्स.
बी.एस.सी. केलेल्या विध्यार्थांसाठी:
बी.टेक आणि पी.एचडी कोर्स
एरोनॉटिकल सोसाईटी ऑफ इंडिया (ASI) द्वारे असोसिएट मेंबरशीप प्रोग्राम

रोजगार संधी:
एरोनॉटीक्स क्षेत्रत कंपन्या आणि सरकारी एजन्सीज मोठ्या प्रमाणावर प्रोफेशनलससाठी  रोजगार उपलब्ध करतात. मुळतः हे एरोस्पेस, मेकेनिकल आणि इलेक्ट्रिकल अभियंते असतात, पण त्याच बरोबर त्यांच्यात एखाद्या तेक्निशिअन आणि शास्त्रज्ञाचे गुण असतात. एरोनॉटिक्स इंडस्ट्री मध्ये एरोडायनामिक्स आणि फ्लुईड डायनामिक्स; प्रोपूलशन, गायडन्स, नेविगेशन आणि कंट्रोल; एयरक्राफ्ट स्ट्रक्चर आणि मटेरीयलस्; मेकेनिकल डीझाईन, इलेक्ट्रॉनिकस् (रडार सोबत) वेपन यंत्रणा आणि फ्लाईट नियंत्रण; कम्युनिकेशन्स; सिस्टिम इंजिनियरींग; सोफ्टवेअर इंजिनियरींग आणि कॉम्प्युटर इंजिनियरींग ह्या सगळ्या साठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहे. एरोस्पेस इंडस्ट्रीच्या एरोनॉटिक्स बाजूला ४ महत्त्वाचे विभाग असतात: मिलिट्री एयरक्राफ्त, सिविलीअन एयरक्राफ्त, एयरक्राफ्त इंजिन्स आणि मिसाईल यंत्रणा.

काही कंपन्या जिथे तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता:
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड.
DDRO
एयर इंडिया
इंडिअन एयरलाईन्स
ISRO

परंतु ह्या कंपन्यानमध्ये काही मर्यादित जागा असतात. दूरस पर्याय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन, डिफेन्स प्रयोगशाळा किवा सिविल एविएशन विभाग येथे रिसर्च आणि विकासाचे या विभागात काम करू शकता.

काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर